स्वागत
कमोडिटी व्यवहारातील आठ व्यावहारिक शब्द
कमोडिटी फ्युचर्स डेरिव्हेटीव्हचे तांदूळ ,कॉफी, सोनं, अल्युमिनियम यांपासून ते अगदी क्रूड तेल आणि कोळसा इत्यादीपर्यंतचे व्यवहार होतात. हे व्यवहार कराराच्या स्वरुपात असतात, की ज्यात विशिष्ट जिन्नस (कमोडिटी) त्याची आधीच निर्धारित केलेली किंमत, जिन्नसाचा आकार (वजन) आणि जिन्नसाची पोच करण्याची तारीख (डिलिव्हरी डेट) नमूद केलेली असते. कमोडिटी फ्युचर्सच्या व्यवहारात वापरले जाणारे आठ व्यावहारिक शब्द किंवा संकल्पना गुंतवणूकदारांना माहीत असणे आवश्यक ठरतं. सॉफ्ट प्राइस, फ्युचर्स प्राइस, लॉट साइज (यूनिट), कॉंट्रॅक्ट क्वालिटी, कॉंट्रॅक्ट ड्यूरेशन, एक्सपायरी डेट, इनिशिअल मार्जिन आणि मार्किंग टू मार्केट या आठ शब्द संकल्पनांचा वापर होत असतो. ‘सॉफ्ट प्राइज’या किमतीस प्रत्यक्ष बाजारपेठेत जिन्नसाचा व्यापार होत असतो. यास रोख मूल्य म्हणूनही संबोधलं जातं.फ्युचर्स च्या बाजारात फ्युचर्स कॉंट्रॅक्टचे ज्या किमतीस व्यवहार होतात त्या किमतीस ‘फ्युचर्स प्राइज’ म्हणतात एक फ्युचर्स कॉंट्रॅक्टसाठी आवश्यक असणारं विशिष्ट जिन्नसाचं एकक (युनिट) किंवा संचास ‘लॉट साइज’ किंवा ‘युनिट ऑफ फ्युचर्स कॉंट्रॅक्ट’ म्हणतात. हे लॉट साइज प्रत्येक बाजारागणिक वेगवेगळे असू शकतात. एवढंच नव्हे,तर जिन्नसाच्या दर्जानुसार बदलत असतात. उदाहरण घ्यायचे तर एनसीडेस्कवर लांब धाग्याच्या कापसाच्या एका फ्युचर्स कॉंट्रॅक्टमध्ये कापसाच्या पंचावन्न गठठ्यांचा संच असतो. फ्युचर्स कॉंट्रॅक्टमध्ये जिन्नसाचीकिंमत त्या जिन्नसाच्या दर्जावर अवलंबून असते. जर या कॉंट्रॅक्टमधून प्रत्याक्ष मालाची पोच (डिलिव्हरी) घ्यायची असेल तर त्या जिन्नसाच्या दर्जास महत्व प्राप्त होते उदाहरणार्थ सोन्याचे फ्युचर्स व्यवहार होताना सोन्याच्या शुद्धतेचा ९९.५% किंवा त्याहून अधिक शुद्धतेचा दाखला एक्सचेंजच्या मान्यताप्राप्त रिफायनरीजनं दिलेला असतो.या दाखल्यावर सही शिक्क्यासहित अनुक्रमांक नमूद केलेला असतो.कमोडिटी मार्केटमधील फ्युचर्सच्या कॉंट्रॅक्टचा निर्देशित केलेला जो अवधि आहे त्यास ‘कॉंट्रॅक्ट ड्युरेशन’म्हणतात. या नुसार फ्युचर्स कॉंट्रॅक्ट किती तारखे पर्यन्त वैध आहे ते कळतं काही विशिष्ट जिन्नसांच्या फ्युचर्स कॉंट्रॅक्टच्या मुदतपूर्तीचा अवधि तीन महिन्यांचा असतो. ‘एक्सपायरी डेट’ या तारखेस फ्युचर्स कॉंट्रॅक्टची मुदत संपते. त्यामुळे या तारखेपर्यंतच या कॉंट्रॅक्टचे व्यवहार होतात. ‘इनिशियल मार्जिन’ म्हणजे कमोडिटी ब्रोकरकडे सुरूवातीस ठेवावी लागणारी अनामत रक्कम. आपण जेवढ्या रकमेचा व्यवहार करू इच्छितो त्या रकमेच्या विशिष्ट प्रमाणात [उदा. ५% किंवा १०% इत्यादी] इनिशियल मार्जिनची रक्कम भरावी लागते.
‘मार्किंग टु मार्केट’ म्हणजे प्रत्येक व्यवहाराच्या दिवस अखेर मार्जिन म्हणून ठेवलेल्या रकमेच्या खात्याशी प्रत्यक्ष बाजारमूल्याशी ताळमेळ केला जातो. यामुळे गुंतवणूकदारांचा नफा किंवा तोटा लक्षात येतो हा नफा-तोटा फ्यूचर्सच्या बंद होतांनाच्या किमतीशी क्लोजिंग प्राइज निगडीत असतो

ज्यावेळी कमोडिटी फ्युचर्स कॉंट्रॅक्ट खरेदी करतात त्यावेळी ‘वेळ’ (टाइम) आणि ‘किंमत’ (प्राइस) हे दोन घटक महत्वपूर्ण ठरतात. वेळेच्या बंधनात एकूण पाच प्रकारच्या मागण्या (ऑर्डर) नोंदवता येतात. ‘गुड टिल डे ऑर्डर’ प्रकारात संपूर्ण दिवसभरासाठी आपली मागणी वैध ठरते दिवसअखेरपर्यन्त ही पूर्ण झाली नाही तर ती आपोआप रद्द होते. ‘गुड टिल कॅन्सल्ड’ प्रकारात एक्सचेंजनं निर्देशित केलेल्या अधिकतम दिवसापर्यंतमागणी अमलात राहते. अर्थात ‘युजर’ नं सिस्टममध्ये ठेवलेल्या, मागणी रद्द होण्याच्या तारखेपर्यंतच ही मागणी वैध ठरते. ‘गुड टिल डेट’प्रकारात मागणी करणार्यानं (युजर) विशिष्ट तारीख दर्शवून, त्या तारखेपर्यंत सिस्टममध्ये नोंदवलेली मागणी वैध तरुण अमलात येते गुड टिल कॅन्सल्ड’प्रमाणेच अधिकतम दिवसाचं बंधन यात असतं. इमिजियेट ऑर कॅन्सल’या प्रकारात मागणी करणार्याने कॉंट्रॅक्ट खरेदी किंवा विक्री मागणी टाकल्याक्षणी अमलात आणावी. अन्यथा ती रद्द ठरवावी. अंशतः जुळणार्या कॉंट्रॅक्टची मागणी प्रसंगी अमलात आणली जाते आणि सुसंगत नसणारा कॉंट्रॅक्टचा हिस्सा त्वरित रद्दबातल केला जातो. ‘फील ऑर किल ऑर्डर’ प्रकारात विशिष्ट मर्यादेत मागणी पूर्ततेसाठी त्वरित प्रयत्न केला जातो. जर त्वरित मागणी पूर्ण झाली नाही तर ती सिस्टममध्ये आपोआपच रद्द होते. या प्रकारात मागणीचा काही हिस्सा इथे पूर्ण करता येत नाही. (ज्या प्रमाणे इमिजियेट ऑर कॅन्सल’या प्रकारात होतो त्याप्रमाणे) इथे एक तर संपूर्ण मागणीची पूर्तता होते किंवा मागणीच रद्दबातल ठरते.किमतीच्या (प्राइस) बंधनात दोन प्रकारच्या मागण्या नोंदता येतात. ‘लिमिट ऑर्डर’सूचनेत एखादा जिन्नस (कमोडिटी) विशिष्ट किमतीस किंवा चागल्या किमतीस खरेदी किंवा विक्री करण्याची मागणी अमलात आणली जाते. या प्रकारात आधीच निश्चित केलेल्या किमतीचं बंधन असल्यानं ती किंमत न आल्यास मागणीची पूर्तता होत नाही. ‘स्टॉप लॉस’सूचनेत खरेदी किंवा विक्री बाजारभावानं करताना ज्यावेळी विशिष्ट पातळीवर ही किंमत पोचते त्यावेळी तोटा कमी होण्यासाठी ही मागणी नोंदली जाते.
कमोडिटी फ्युचर्स कॉंट्रॅक्टची सौदापूर्ती तीन प्रकारे होते पहिल्या प्रकारात मुदतपूर्तीआधी फ्युचर्स पोझिशन बंद करण्यासाठी विरुद्ध व्यवहार (खरेदी किंवा विक्री) ट्रेडर करतो. त्यास ‘स्केअरिंग ऑफ पोझिशन’ म्हणतात. उदाहरणच बघायचं झालं तर एका गुंतवणूकदारानं ३१ डिसेंबर २०१३ चे एक सोन्याच्या फ्युचर्स कॉंट्रॅक्टमध्ये लोंग पोझिशन घेतली. त्यासाठी त्याने ३२१५ रुपये किंमत ठरवली होती. परंतु २५ जानेवारी २०१४ मध्ये हा गुंतवणूकदार प्रचलित विद्यमान दरानं कॉंट्रॅक्ट विकून, नफा किंवा तोटा पदरात पाडून घेऊ शकतो. व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी कॉंट्रॅक्टच्या मुदतपूर्तीपर्यंत थांबून रोखीत सौदापूर्ती केली जाते. ही कॉंट्रॅक्ट व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी अनामत रकमेशी जुळवून घेऊन सर्व ‘पोझिशन्स’ बंद केल्याचं घोषित केलं जातं. त्या त्या जिन्नसाची बंद होणार्या स्पॉट प्राइसशी सौदापुर्तीची किंमत मिळतीजुळती असते.एका उदाहरणावरून हे लक्षात येईल. १५ डिसेंबरला गुंतवणूकदारानं लांब धाग्याच्या कापसाच्या पाच गड्डीसाठी शॉर्ट पोझिशन रु. ६९५० साठी घेतली.२० फेब्रुवारीला व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सॉफ्ट प्राइस रु. ६७२५ आहे. मग हीच किंमत सौदापुर्तीची किंमत मानली जाते. शॉर्ट पोझिशन’ कापूस या जिन्नसात घेतल्यान कापसाची प्रत्यक्ष पोच (डिलिव्हरी) न घेता रु. २२५ चा नफा प्रत्येक कापसाच्या ट्रेडिंग युनिटमध्ये रोखीत घेऊ शकेल. तिसर्या प्रकारात प्रत्यक्ष मालाची पोच स्वीकारून किंवा देऊन सौदापूर्ती केली जाते. ही पोच स्विकारणार्यानं गोदामाची (वेअरहाऊस) व्यवस्था केलेली असणं आवश्यक ठरतं.
कमोडिटी डेरिव्हेटिव्हच्या व्यवहारात जोखीम अधिक असल्यानं गुंतवणुकदारांना योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य ब्रोकिंग हाऊसकडे गुंतवणूक करणं इष्ट ठरतं. किमान गुंतवणूक एक लाख रुपये असल्यानं सामान्य गुंतवणूकदार या क्षेत्रापासून आता दूर असला तरी भविष्यात ही रक्कम कमी होण्याची शक्यता आहे. कमोडिटी डेरिव्हेटीव्हच्या ट्रेडिंगसाठी ब्रोकरसोबत करार (क्लाएंट एग्रीमेंट) करून आयकराच्या कायमस्वरूपी क्रमांकाच्या प्रतीसह वास्तव्याचा दाखला, पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे, बँक खात्याची माहिती (जे खातं या ट्रेडिंग व्यवहारासाठी वापरलं जाणार त्याची माहिती) इत्यादी कागदपत्रं द्यावी लागतात. व्यवहार सुरू करण्याआधी ब्रोकरकडे अनामत रक्कम (मार्जिन मनी) ट्रेडिंग खात्यात जमा करावी लागते. हे सर्व व्यवहार चेकनेच करावे लागतात.जर ट्रेडिंग खातं आणि डिमॅट खातं एकाच बँकेत असेल तर रक्कम एका खात्यातून दुसर्या खात्यात त्वरित जमा होते. ब्रोकिंग हाऊस किंवा ब्रोकरची नीट माहिती काढून आणि त्याच्या विश्वासाहर्तेबरोबरच व्यावहारिक तत्परता आणि व्यावसायिक अनुभवाची खातरजमा करूनच त्यांच्याकडे खातं उघडून व्यवहार करावेत. दलालीच्या शुल्काचे प्रमाण निश्चित करून घ्यावं.

Our Sponsors