स्वागत
नामवंतांच्या स्वाक्षर्या… संपत्ती निर्मितीच्या पाऊलखुणा
दहा वर्षांपूर्वी जुलै २००४ मध्ये कोलकत्त्यामध्ये निशांत सिंघल नामक व्यक्तीने भारतात एक इतिहास घडविला. या निशांत सिंघलना वयाच्या तेराव्या वर्षापासून सर्व क्रिकेटपटूंच्या स्वाक्षर्या गोळा करण्याचा छंद जडला होता. खरे तर असा छंद बर्याच लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा असतो. पण या सिंघल यांनी आपल्याकडील स्वाक्षर्या लिलावात विकण्यास काढल्या. त्यांचा संपूर्ण संग्रह लिलावात विक्रीस जाऊन त्यांना पंधरा लाख रुपये मिळाले. त्यापैकी साडेचार लाख रुपये ९८ क्रिकेटपटूंच्या स्वाक्षर्यांच्या विक्रीतून मिळाले होते. अर्थात या ९८ स्वाक्षर्या गोळा करण्यास सिंघल यांना जवळजवळ १४ वर्षे लागली होती. सिंघल यांच्या कृतीतून एकीकडे चलनवाढीवर मात करून आणि चलनातील[करन्सी] अस्थिरतेला तोंड देत वर्षाला किमान बारा ते सोळा टक्के सरासरी वृद्धी दर असा छंद सहज देऊन गेला. यामुळे भारतातील स्वाक्षरी संग्राहकांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले. अर्थातच आता स्वाक्षर्या गोळा करणे आज केवळ छंद न राहता प्रदीर्घ अवधीत चांगले उत्पन्न दर दर्शविणारे गुंतवणुकीचे साधन ठरले आहे.
स्वाक्षरी जेव्हढी दुर्मिळ तेव्हढी तिची किंमत अधिक असते. १९९७ ते २००७ काही स्वाक्षर्यांच्या मूल्यात एक हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. स्वाक्षर्यांच्या गुंतवणुकीचे शेअरबाजाराप्रमाणे दोन निर्देशांक आहेत-पीएफसी ४० औटोग्राफ इंडेक्स आणि फ्रेझर्स १०० इंडेक्स.हे निर्देशांक पॉल फ्रेझर हा स्वाक्षरी संग्राहक सातत्याने प्रसारित करत असतो. या निर्देशांकात गुंतवणूक करणार्यांची संख्या वाढत आहे. या निर्देशांकानी सुमारे १४.८६ टक्के वार्षिक दराने वृद्धी दर्शविली आहे. संपूर्ण जगभरात सुमारे तीस कोटी स्वाक्षरी संग्राहक असून ब्राझिल, रशिया, चीन आणि भारत या ‘ब्रिक’ देशांमध्ये स्वाक्षर्या संग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. संपूर्ण जगात दुर्मिळातील दुर्मिळ स्वाक्षर्यांमध्ये अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आणि गोल्फ खेळाडू टायगर वूड्स यांच्या स्वाक्षर्यांचा समावेश आहे. वॅल्ट डिस्ने, प्रिंसेस डायना, चार्ल्स डिकन्स आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या स्वाक्षर्या सुद्धा दुर्मिळतील दुर्मिळ मानण्यात येतात. भारतीय व्यक्तींमध्ये सर्वात दुर्मिळ आणि महाग स्वाक्षरी महात्मा गांधींची असून त्याचे मूल्य सुमारे पावणे सात लाख रुपये आहे. मदर टेरेसांच्या स्वाक्षरीचे मूल्य ७७ हजार रुपये, राजा राममोहन रॉय यांच्या स्वाक्षरीचे मूल्य ७० हजार रुपये, रविंद्रनाथ टागोर यांच्या स्वाक्षरीचे मूल्य ४९ हजार रुपये तर जवाहरलाल नेहरूंची स्वाक्षरी ३५ हजार रुपये मुल्याची आहे. या सर्वांच्या तुलनेत इंदिरा गांधींच्या स्वाक्षरीचे मूल्य वीस हजार रुपयांच्या आसपास आहे.

Our Sponsors