स्वागत
व्यक्तीसापेक्ष जोखीम
एकत्र कुटुंबात वडीलधारी व्यक्ति ‘कर्ता’ असते. त्यामुळे व्यक्तीसापेक्ष जोखीमेचा घटक महत्वाचा ठरतो. आर्थिक व्यवहाराचे सर्व अधिकार कर्त्याला असतात. त्यामुळे कर्त्यांने घेतलेले बरे-वाईट निर्णय संपूर्ण कुटुंबावर परिणाम करत असतात. अशा प्रकारचे निर्णय घेण्याआधी कुटुंबातील सर्व मोठ्या व्यक्तींचा मतप्रवाह जाणून घेतला तर तोटा न होता फायदाच होतो. पण बर्याचदा कर्त्याचा आग्रह उपस्थित होत असल्यानं अविभक्त कुटुंबातील ‘कर्ता’ हीच जोखीम (रिस्क) ठरते. कुटुंबातील गुंतवणुकीत, मालमत्तेत आणि संपत्तीत नेहमीच कर्त्याचे नाव पुढे येत असल्याने आयकराचे दायित्व कर्त्याला माथी घ्यावे लागते. दूरदृष्टी न ठेवता, वारसाचं नामांकन न करता, केवळ स्वतःच्या नावावरच गुंतवणूक आणि मालमत्ता ठेवणार्या कर्त्याच्या पश्चात संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास होतोच,पण मालमत्ता आणि गुंतवणूक मिळवण्यास व्यर्थ खर्च करून आटापिटा करावा लागतो. कर्त्यांने गुंतवणूक करण्याआधी प्रत्येकाचं मत विचारात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून, एकमतानं निर्णय घेतल्यास कर्त्याबरोबरच कुटुंबाचाही लाभ होतो अविभक्त कुटुंबाप्रमाणे विभक्त कुटुंबातील पती-पत्नी व सज्ञान मुलांशी चर्चा किंवा विचारविनिमय करणं आवश्यक ठरतं त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची गुंतवणुकक्षमता आजमावता येते.कर्त्यानं स्वतःचं स्थान जोखीमीच आहे याच भान ठेवणं आवश्यक ठरतं म्हणूनच कुटुंबातील जाणकार व्यक्तींच्या नावे वेळीच वाटून ठेवावी. प्रत्येक सज्ञान व्यक्तीस कुटुंबातील संपत्तीच्या, मालमत्तेच्या जपणूकीबाबत कर्त्यानं मार्गदर्शन करताना काही कमी महत्वाचे निर्णय घेण्यास उद्युक्त करावे. अशा निर्णयाबाबत कर्त्याने स्वतःही जोखीम स्वीकारण्याची सवय करणे आवश्यक आहे.
विभक्त कुटुंबात पती आणि पत्नी दोघेही जोखीमयुक्त ठरत असतात. दोघांपैकी कोणाचाही निर्णय चुकीचा ठरल्यास परिणाम दोघांना भोगावे लागतात. आपली गरज, बचत क्षमता, भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे आणि विद्यमान कौटुंबिक जबाबदार्या या चार घटकांवर गुंतवणुकीचे निर्णय अवलंबून असल्याने याबाबत दोघांनी विचारपूर्वक कृती करणे अपेक्षित असते. सज्ञान व्यक्ति पुरुष असल्यास त्याचा व्यवसाय, विवाहित आहे की अविवाहित, स्वत:च्या कौटुंबिक जबाबदार्या यांचा विचार होणे गरजेचे असते. सज्ञान व्यक्ति स्त्री असेल तर विवाहानंतर तिची स्वत:ची गुंतवणूक तिलाच द्यायची की घरातील अन्य सदस्यांच्या संयुक्त नावे माहेरीच ठेवायची याबाबत स्पष्ट आणि पूर्ण विचार विनिमय करून असे निर्णय घेणे अपेक्षित असतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, उत्पन्न, खर्च करण्याची प्रवृत्ती आणि गुंतवणूक क्षमता वेगवेगळी असते. आर्थिक वाद टाळून आणि योग्य काळजी घेऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तिसापेक्ष जोखीम कमी करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे.

मृत्यूपत्र…….. नव्हे इच्छापत्र !
आपण एवढी गुंतवणूक करतो, स्थावर–जंगम संपत्ती तयार करतो, परंतु आपल्या पश्चात ही गुंतवणूक आणि स्थावर –जंगम याबाबत कोणतेही वाद-तंटे आपल्याच वारसांमध्ये निर्माण होऊ नयेत असं वाटत असेल तर आपल्या हयातीत ‘मृत्यू पत्र’ (विल) करून ठेवावे. मृत्युपत्रास इच्छापत्रही म्हंटलं जातं. मृत्यूपत्र बनवलं की मृत्यूस आमंत्रण केल जातं. असा एक गैरसमज समाजात आहे. अशाश्व्वत जीवन लक्षात घेता आपल्या इच्छेनुसार आपल्याच माणसांना न्यायानं वाटणी करण्याचा अधिकार आपल्याला या मृत्युपत्राद्वारे वापरता येतो. खर तर ते आपलच इच्छापत्र असतं…… आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे एक हमी पत्र! एका पेक्षा अधिक संतती असेल किंवा संतती अजिबात नसेल किंवा अविवाहित असाल किंवा विनापत्य विधवा / विधुर असाल, तर इच्छापत्राची अत्यंत आवशक्यता असते इच्छापत्र म्हणजे नेमके काय ? आपल्या पश्चात स्वकष्टार्जित संपत्तीची वाटणी कोणाला किती व कशी करावी या बाबत कायदेशीर स्वरुपात, परंतु सुबोध आणि सोप्या भाषेतील लिखित इच्छा म्हणजे इच्छापत्र.
इच्छापत्र दोन प्रकारची असतात एक विशेष इच्छापत्र, तर दुसरं सामान्य इच्छापत्र ,ज्यांना विशेष इच्छापत्र लागू नसतात तेच सामान्य इच्छापत्र बनवू शकतात. ‘विशेष इच्छापत्र’ लष्करातील भुसैनिक, वायुसैनिक व नौसैनिकांसाठी लागू असते. विशेष इच्छापत्रात साक्षीदार नसले वा इच्छापत्राखाली सही नसली तरी ते वैध ठरते. परंतु ते स्वहस्तलिखित स्वरुपात असणे आवश्यक ठरते. तोंडी सांगितलेलं इच्छापत्र असेल तर दोन साक्षीदार असणे आवश्यक ठरते. विशेष इच्छापत्राची ही सोय युद्ध सैनिकांनाच उपलब्ध आहे. अर्थात युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर आल्यावर मात्र ते विशेष इच्छापत्र करू शकत नाही. तेव्हा त्यांनाही सर्वसाधारण लोकांप्रमाणेच ‘सामान्य इच्छापत्र’लागू होते॰ कोणतेही इच्छापत्र बनवण्यासाठी वकीलच हवा असतो, अशी एक गैरसमजूत आहे. आपणही हे इच्छापत्र साध्य कागदावर बनवू शकतो. पण हे इच्छापत्र लेजर पेपरवर (हिरव्या रंगाचा कागद) करणं योग्य ठरतं कारण या प्रकारच्या कागदाच आयुष्य चांगलं असतं मुक-बधिर, वा अंध लोकही इच्छापत्र बनवू शकतात. ब्रेल लिपीतील इच्छापत्र साक्षांकीत (दोन साक्षीदारांकडून) केलेलं असेल तर ते वैध ठरते.

अठरा वर्षावरील कोणीही व्यक्ति जी मानसिकदृष्ट्या संतुलित आहे. ती इच्छापत्र बनवू शकते.या इच्छापत्रावर किमान दोन साक्षीदारांच्या सह्या, नाव व पत्ता असणं आवश्यक आहे. साक्षीदारानं इच्छापत्राचा मजकूर वाचलाच पाहिजे असं बंधन नाही. या साक्षीदारांमध्ये फॅमिली डॉक्टरांचा समावेश केला असता अधिक योग्य ठरतं. साक्षीदार शक्यतो तरुण व आपल्या विश्वासातील परिचित असावेत. स्वकष्टार्जित आणि संपूर्णतः स्वतःच्या मालकी हक्काची स्थावर –जंगम आणि गुंतवणुकीची वाटणी करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तिला आहे. वडीलोपार्जित आणि सामायिक असलेल्या मालमत्तेची वाटणी करता येत नाही. वडीलोपार्जित परंतु स्वतःच्या पूर्णतः मालकी असलेल्या मालमत्तेची वाटणी मात्र या इच्छापत्रात करता येते. जी संपत्ती किंवा स्थावर हस्तांतरणीय नाही अशा कोणत्याही मालमत्तेबाबतच्या सूचना किंवा वाटण्या इच्छापत्रात करता येत नाही. ज्या मालमत्ता प्रदीर्घ काळाच्या भाडेतत्वावर [लीजवर] किंवा आयुष्यभर फक्त उपभोगण्यासाठी [लाईफ इंटरेस्ट] असेल तर अशी संपत्ती किंवा मालमत्ता इच्छापत्राने वारस देणगी म्हणून देता येत नाही. म्हाडा, सिडको, एमआयडीसी किंवा अन्य स्वायत्त संस्थांशी ९९ वर्षांसाठी किंवा तत्सम प्रदीर्घ काळासाठी केलेल्या भाडेकरारानुसार उपभोक्त्या व्यक्तीस मालकीहक्क प्राप्त होत नसतो. परंतु हे लीज संपेपर्यंत मर्यादित हक्क उपभोगता येत असतात. तसेच हिंदू अविभक्त कुटुंबाच्या सदस्यांपैकी एकजण त्या एकत्रित कुटुंबाच्या सर्व संपत्तीबाबत इच्छापत्र करू शकत नाही. पण त्यातील स्वत:च्या हिश्श्याचे मात्र इच्छापत्राद्वारे वाटप कसे करावे हे तो सदस्य ठरवू शकतो.इच्छापत्रातील वाटणीचे लाभ कोणाही संस्था किंवा देवस्थाने यांनाही देता येतात. परंतु जर इच्छापत्र करणारा हिंदू नसेल तर मात्र हे इच्छापत्र उपनिबंधकाकडे नोंदणे आवश्यक ठरते.
एकदा बनवलेलं इछापत्र आपण आपल्या हयातीत कितीही वेळा बदलू शकतो. पण त्या प्रत्येक वेळी आधी केलेलं इच्छापत्र रद्द केल्याच नवीन पत्रात नमूद करावं लागतं.जर एक वा अनेक इच्छापत्र याआधी केलेली असतील तर नवीन बनवल्या जाणार्या इच्छापत्रात प्रारंभीच ‘हेच माझे शेवटचे इच्छापत्र असून या इच्छापत्राद्वारे मी या पूर्वी केलेली इच्छापत्रे व पुष्टीपत्रे रद्द ठरवीत आहे’ हे वाक्य लिहूनच तरतुदी लिहाव्यात.

इच्छापत्रात काही बदल करण्यासाठी किंवा त्यात नमूद केलेल्या काही तरतुदींसाठी खुलासा करण्यासाठी किंवा अन्य तरतुदींची वाढ करण्यासाठी पुष्टीपत्र (कोडिसील) केले जाते. हे पुष्टीपत्रही इच्छापत्राप्रमाणे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरण्यासाठी सही करून साक्षांकीत (विटनेस) करणं आवश्यक ठरतं. इच्छापत्राची अंमलबजावणी आपल्या पश्चात होणार असल्यानं व्यवस्थापक (एक्झिक्यूटर) म्हणून शक्यतो आपल्यापेक्षा वयानं तरुण, विश्वासू, आणि विवेकी व्यक्ति नेमावी. हा व्यवस्थापक मृत्यूपत्राच्या लाभार्थीपैकी असला तरी चालतो.
इच्छापत्राच्या दोन प्रती काढून मूळ इच्छापत्र बँकेच्या किंवा स्वतःच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावं॰ एक प्रत सीलबंद पाकीटातच व्यवस्थापकाकडे ठेवावी. दुसरी प्रत स्वतःच्या विश्वासू आणि हितचिंतक असलेल्या मित्र किंवा नातेवाईकांकडे द्यावी. इच्छापत्र एकच असावे त्याच्या अनेक प्रती काढून त्यावर एकच मूळ सही कधीच करू नये. लाभधारक वारसांना जर इच्छापत्राची प्रत द्यायचीच असेल तर झेरॉक्स प्रत द्यावी. इच्छापत्र बनवण्याआधी आपले वारस व त्यांची आपल्याबद्दल आणि संपत्तीबद्दल असणारी मते, भूमिका व आस्था लक्षात घ्यावी. आपल्या इच्छापत्रामुळे वारसांमध्ये कोर्ट-कज्जे होणार नाहीत वा आपले किंवा त्यांचे आपापसातील नातेसंबंध तुटणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. घरात सतत होणार्या वादात किंवा भांडणात इच्छापत्राद्वारे काय देणार, काय देणार नाही, किंवा इच्छापत्राच्या पुष्टीपत्राद्वारे नवीन तरतूद करण्याची धमकी देऊ नये. यामुळे इतर लाभधारक वारसांबद्दल घृणा निर्माण होते.
इच्छापत्र अंमलात आणताना न्यायालयाकडून ‘प्रोबेट’ आणण्यास सांगितलं जातं. प्रोबेट म्हणजे न्यायालयानं इच्छापत्राच्या खरेपणाबाबत दिलेला दाखला असतो. अर्थातच न्यायालयाकडून तशी तपासणी करूनच ‘प्रोबेट’ दिले जाते. वारसाहक्कानं हस्तांतरित संपत्तीवर इस्टेट ड्यूटी द्यावी लागत नाही तसेच हस्तांतरणाचे मुद्रांक शुल्कही लागत नाही. ज्या संपत्तीची तुम्ही निर्मिती केली आणि तुमच्या पश्चात त्याचा विनियोग करण्यासाठी जर कोणीही वारस नसेल तर ती संपत्ती सरकार जमा होते. इच्छापत्राचा नमूना हवा असेल तर मुंबई ग्राहक पंचायतीकडे इंग्रजी व मराठी भाषेत अवघ्या पाच रुपयात उपलब्ध होतो.

आता मृत्युपत्र नव्हे…. इच्छापत्र तयार करण्यासाठी वकील शोधावे लागणार नाहीत की आर्थिक नियोजक. नॅशनल सिक्युरिटीज डिपोंझिटरी लिमिटेडच्या ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मुंबईस्थित वोंर्मोंड ट्रस्टीज अँड एक्झिक्युटर्सच्या संयुक्त विद्यमाने EzeeWill.com हे संकेत स्थळ स्थापन केले आहे. ज्यांना इच्छापत्र तयार करायचे आहे त्यांनी प्रथम या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करून लोंगईन आयडी तयार करावा. त्यानंतर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे किंवा नेट बँकिंग द्वारे शुल्काचा भरणा करावा. त्यानंतर आपली वर्गवारी निश्चित करावी. यात पुरुष की स्त्री, धर्म, निवासी भारतीय की अनिवासी भारतीय, विद्यमान व्यवसाय इत्यादी माहिती भरली की आपली नेमकी वर्गवारी केली जाते. त्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या त्यांची माहिती, आपली स्वत:च्या मालकीहक्क प्रस्थापित केलेली मालमत्ता-संपत्ती यांची सविस्तर माहिती द्यावी. त्यानंतर आपल्या पश्चात आपण कोणाकोणाला आणि किती मालमत्तेचे वाटप करणार आहोत त्याची नेमकी वाटणी नमूद करावी. यात आपल्या सर्व मालमत्तांचा-संपत्तीचा तपशील आला असल्याची खात्री करून इच्छापत्राचा कच्चा नमूना मिळण्यासाठी क्लिक करावे. हा कच्चा नमूना आल्यावर तो नीट वाचून परीक्षण करून आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याची खात्री करून घ्यावी. तशी खात्री पटली की पुन्हा क्लिक करून अंतिम मसुदा मिळण्यासाठी आदेश द्यावेत. हा अंतिम मसुदा ईमेल द्वारे किंवा घरपोच पाठविला जातो. या प्रक्रियेसाठी किमान दोन आठवडे लागतात.
एच डी एफ सी सिक्युरिटीज तर्फेही ई-विल सेवा देण्यात येत आहे. या सेवेसाठी शुल्क भरल्यावर साठ दिवसांच्या आत इच्छापत्र नमूना निश्चित करण्याची जबाबदारी ग्राहकाची असते. ग्राहकाने भरलेली संपूर्ण माहिती दोन्ही सेवा संस्थांकडून गुप्त ठेवली जाते. आज कायदेशीर भाषेतील योग्य आणि अपेक्षेनुसार इच्छापत्र बनविण्यासाठी चांगले कायदेतज्ञ पंधरा-वीस हजार रुपयांचे शुल्क आकारतात. पण या ई-विलचे किमान शुल्क चार हजार रुपये असून अतिरिक्त परीक्षणासाठी प्रत्येकवेळी २५० रुपये आकारले जातात. जर घरपोच इच्छापत्र हवे असेल तर नॅशनल सिक्युरिटीज डिपोंझिटरी लिमिटेड पाचशे रुपये त्यासाठी वेगळे आकारते. अर्थात ही घरपोच सेवा सद्या मर्यादित शहरांसाठीच आहे. ज्यांना मातृभाषेत इच्छापत्र हवे असेल त्यांची थोडी गैरसोय इंग्रजीमुळे होऊ शकते पण लवकरच ही पण सुविधा उपलब्ध होईल हे नक्की.

Our Sponsors