स्वागत
पांढर्या धातूतील अशीही गुंतवणूक
आज सोन्याच्या बरोबरीने प्लॅटिनमचे अलंकार भारतीयांना वेड लावत आहेत. पण अजूनही काहीजण प्लॅटिनमला नाके मुरडत आहेत. पण केवळ प्लॅटिनमच नव्हे तर त्याच्या जातकुळीतील पॅंलाडियम, ह्रोडियम, इरिडियम, रुथेंनियम आणि ओसीयम या पाच धातूंचे पर्याय गुंतवणुकीसाठी भारतीयांपुढे हळूहळू येत आहेत. भारतात सद्या पॅंलाडियम या धातूचा चंचु प्रवेश झालेला आहे. प्लॅटिनमला पर्याय म्हणून दागिन्यांच्या निर्मितीसाठी पॅंलाडियमकडे आज सर्वजण बघत असले तरीही या धातूची औद्योगिक उपयुक्तता महत्वाची आहे. वाहन निर्मिती, ईलेक्ट्रोनिक्स, दंतचिकित्सा [डेंटिस्ट्री] आणि रासायनिक प्रक्रियांमध्ये पॅंलाडियमचा वापर अधिक आहे.
२०१४च्या पहिल्या तिमाहीत प्रती औंस ७५० डॉलर्स असलेला पॅंलाडियमचा भाव आज प्रती औंस ८५० डॉलर्सवर पोहोचला आहे. सोन्यापेक्षा किंमत स्थिरता असलेला पॅंलाडियमचा भाव गेल्या चार वर्षात सोन्याच्या तुलनेत कायम वर्धिष्णू ठरला आहे. गेल्या चार वर्षात सोन्याने वीस टक्के वृद्धी दर दर्शविला तर पॅंलाडियमचा वृद्धी दर ७० टक्के होता. मागील तीन, दोन आणि एक वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत अनुक्रमे -७%, -२७% आणि -२२% घट झाली.
पण पॅंलाडियमचा दर मात्र मागील तीन, दोन, आणि एक वर्षात अनुक्रमे ७%, १२% आणि २२% दराने वाढतोच आहे. मागील सहा महिन्यात सोन्याच्या दरात अकरा टक्केणी कपात झाली पण पॅंलाडियमच्या दरात मात्र ७%नी वाढच झाली आहे.
आज पॅंलाडियममध्ये जे छोटे गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत ती कोंईन म्हणजेच नाण्याच्या स्वरुपात! या नाण्यांना पॅंलाडियम बुलियन कोंईन असे म्हटले जाते. हा धातू बार किंवा वेफर्सच्या आकारात उपलब्ध आहे. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि युरोपातील काही देशांमध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या स्वरुपात पॅंलाडियमचे युनिट्स उपलब्ध आहेत. ज्यांना पॅंलाडियममध्ये गुंतवणूक करायची आहे ते या पॅंलाडियम एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या [ईटीएफ] युनिट्सच्या माध्यमातून करतात. दुर्दैवाने आज भारतात ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पॅंलाडियम बुलियन कोंईन किंवा बार शिवाय भारतीयांना पर्याय नाही.

दक्षिण आफ्रिकेतील खाण कामगारांच्या प्रदीर्घ संपामुळे आणि युरोपातील वाहन विक्रीत आलेल्या मोठ्या मंदीमुळे फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रति औंस १७४२ डॉलर्स असलेला प्लॅटिनमचा भाव जून २०१४ मध्ये प्रति औंस १२९४ डॉलर्सवर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सुवर्ण उद्योग क्षेत्रातील अत्यंत अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी आपला रोख प्लॅटिनमकडे वळवला आहे. ते प्लॅटिनमच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडांत मोठी गुंतवणूक करीत आहेत. आज प्लॅटिनमचा वापर जगभरात अलंकारांसाठी ३४ टक्के, वाहन उद्योगासाठी उत्प्रेरक म्हणून ४० टक्के, सहा टक्के गुंतवणुकीसाठी तर उर्वरित वीस टक्के रासायनिक, ईलेक्ट्रोनिक्स, आणि काच उद्योगांसाठी होत आहे. प्लॅटिनमच्या अलंकारांसाठी सर्वात अधिक म्हणजे एकूण मागणीच्या सत्तर टक्के मागणी चीन कडून असून त्यानंतर जपान [११%], उत्तर अमेरिका[६.७%] आणि युरोपातील काही देशांचा क्रमांक लागतो.
भारतातील अतिश्रीमंत कुटुंबांमध्ये प्लॅटिनमचे दाग-दागिने प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात असल्याने प्लॅटिनमची भारतात मागणी वाढत आहे. लग्न निश्चित झाल्यावर साखरपुडयासाठी प्लॅटिनमच्या अंगठीने [Wedding Ring] उच्च मध्यम वर्गाचे लक्ष खेचून घेतले आहे. गोल्ड ईटीएफच्या मागणीच्या तुलनेत प्लॅटिनमच्या ईटीफने ४८ टक्केने मोठी मजल मारली आहे. एकट्या दक्षिण आफ्रिकेतच प्लॅटिनमच्या ईटीएफमध्ये [ज्याला ते न्यू प्लाट असे संबोधतात.] मे महिन्यात प्रारंभ झाल्यावर ७८२१९४ औंस प्लॅटिनम जमा झाले. आज हाच ‘न्यू प्लाट’ जगातला सर्वात मोठा प्लॅटिनमचा ईटीएफ ठरला आहे.
२००६ मध्ये १६५००० औंस प्लॅटिनमचे उत्पादन करणार्या झिंबाब्वे देशाने दर वर्षागणिक उत्पादन वाढत नेले आहे. २०१३ मध्ये तर ४००००० औंस प्लॅटिनमचे विक्रमी उत्पादन झिंबाब्वेने केले आहे. संपूर्ण जगभरात उत्पादित होणार्या देशांमध्ये झिंबाब्वेचा तिसरा क्रमांक लागत असून एकूण उत्पादनाच्या सात टक्के हे उत्पादन आहे. भारतात अजूनही चांदीतील गुंतवणुकीसाठी सिल्व्हर ईटीएफ येऊ शकलेले नाही तर प्लॅटिनम ईटीएफ, पॅंलाडियम ईटीएफ यांचा प्रवेश दूरच दिसतोय.

Our Sponsors