स्वागत
हिर्यात गुंतवणूक करण्याआधी……
हिर्यात गुंतवणूक करताना किंवा हिर्याचे अलंकार खरेदी करताना खूपच सावधगिरी बाळगायची असते. इंटरनॅशनल जेमोलोजिकल लॅबोरेटरीजच्या प्रमाणित [सर्टिफाईड] हिर्याना किंवा हिर्यांच्या अलंकारांना महत्व प्राप्त झाले आहे. हिर्याची वैशिष्टे चार ‘सी’ मध्ये मोजली जातात.रंग [Colour], स्पष्टता [Clarity], पैलू [Cuts], आणि वजनाचे परिमाण कॅरेट [Carat]. खाणीतून काढलेला हिरा आकारहीन असतो. त्यामुळे त्याला आकारात कापून शंकूसारखा आकार दिला जातो. त्यानंतर हिर्याला पॉलिश केले जाते त्यामुळे त्याची चकाकी वाढते. शेवटी प्रत्येक हिर्याला छपन्न पैलू पाडले जातात. हीर्यांचा आकार आणि कोनांचा समन्वय साधून भौमितिय दृष्टीने पैलू पडल्यास ते हिरे अधिक लखलखतात.,असे मार्सेल टोल्कोवस्कीने १९१९ मध्ये प्रथम दर्शविले.हे पैलू ब्रिलियंट कट, रोझ कट, कुशन कट, बॅग्वेट किंवा मार्क्वित्झ कट अशा काही पारंपरिक आकारात पाडले जातात. सध्या संगणकीकृत लेझर प्रक्रियेणे फॅन्सि आकारातही पैलू पडले जातात.
हिर्याचा रंग सफेद स्वच्छ असेल आणि त्यात एकही तडा [Flaw] नसेल तर इंग्रजी ‘डी’अक्षराने हे वैशिष्ट्ये नोंदले जाते. ‘डी’ पासून ‘एफ’ पर्यंतची तीन अक्षरे हिर्याच्या सफेद स्वच्छ रंगाची खात्री देतात. ‘जी’ ते ‘जे’ हि अक्षरे रंगहीनता [Colourless] दर्शवितात. के, एल आणि एम हि अक्षरे फिकट पिवळसर तर ‘एन’ ते ‘आर’ पर्यंतची अक्षरे अतिफिकट पिवळसर रंग दर्शवितात. ‘एस’ ते ‘झेड’ पर्यंतची अक्षरे फिकट पिवळा रंग दर्शवितात. झेड प्लस हि श्रेणी मात्र फॅन्सि रंगीत हिर्यांसाठी असते.
हिर्यांची स्पष्टता सहा प्रकारच्या वर्गवारीत केलेली असते. सर्वोत्कृष्ट स्पष्टता ’एफ’[म्हणजेच तडाविरहित-Flawless] अक्षरातून दर्शविली जाते.‘आय एफ’ही अक्षरे हिर्याच्या अंतर्भागात नसून फक्त बाह्य भागात तडा असल्याचे दर्शवितो. व्हीव्हीएस-१- व्हीव्हीएस-२, व्हीएस-१ – व्हीएस-२, एस ११-एस १२ आणि ११-१२-१३ या चार वर्गवारीत हिर्यांची स्पष्टता किती अस्पष्ट आणि भेगांसहित आहे ते दर्शविले जाते.
प्रत्येक हिर्याचे वजन कॅरेटमध्ये मोजले जाते. [एक कॅरेट =१०० सेंट]. कॅरेट हा शब्द चॉकलेटला पर्यायी म्हणून वापरल्या जाणार्या ‘कॅरेब’ या बियांपासून आला आहे. या कॅरेबच्या प्रत्येक बीचे वजन समान असते. या बीचे वजन आता ०.२ ग्रॅम असे प्रमाणित केल्याने एक कॅरेट =०.२ ग्रॅम असे म्हणता येते. गुंतवणुकीसाठी जर हिरा घ्यायचा असेल तर किमान पन्नास सेंट वजनाचा हिरा असेल तर योग्य ठरते.
कृत्रिम रत्ने आणि खड्यांची दुनिया
खरे मोती सुद्धा दुर्मिळ ठरत असल्याने १९३० पासून जपान मध्ये कल्चर्ड मोती निर्माण केले गेले. म्युझेल हा जलचर कल्चर्ड मोती निर्माण करतो. जपान आणि चीन हे देश या जलचराच्या माध्यमातून अनेक टनांमध्ये मोत्यांचे उत्पादन घेतात. भारतात केवळ मदुराईत आढळणारे खरे मोती ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने इराण, व्हेनेझुएला, श्रीलंका अशा अनेक देशांतून मोती आयात करावे लागतात.
हे कृत्रिम हिरे किंवा रत्ने मूळ हिरे किंवा रत्नांपेक्षा महाग नसतात पण तरीही मूळ आणि कृत्रिम मधला फरक ओळखणारा रत्नपारखी आवश्यक ठरतो अन्यथा या क्षेत्रात फसवणूक हमखास होते. यात गुंतवणूक करताना हीच तर मोठी जोखीम असते.
ज्या वेबसाईटवरून अलंकार किंवा तत्सम खरेदी करायचे असेल त्या वेबसाईटची विश्वासार्हता लक्षात घ्यावी लागते. या ऑन लाईन ज्वेलरी विक्रेत्यांवर व्यक्त झालेले अभिप्राय माऊथशट डॉट कॉम [mouthshut.com] वर तपासून मगच निर्णय घ्यावा. वस्तु किंवा अलंकार पसंत पडला नाही तर परत स्वीकारण्याचा अवधी किती आहे ते बघावे. या अवधीत शिपिंगसाठी किंवा डिलिव्हरीसाठी लागणारा अवधी वगळून असणारे दिवस किती आहेत याची पडताळणी करणे इष्ट ठरते. जे विक्रेते ट्रांझिट इन्श्युरन्स न उतरविता तुमच्याकडे माल पाठवणार असे सांगतात अशा विक्रेत्याना नकार देणे योग्य ठरते. आज सर्व प्रकारच्या अलंकारांसाठी johareez.com आणि jewelsnext.com या वेबसाईट्स तर फक्त हिर्यांच्या अलंकारांसाठी caratlane.com आणि suratdiamonds.com आणि ब्रँडेड ज्वेलरीसाठी tanishq.co.in आणि gitanjaligroup.com अशा तीन वर्गवारीत ऑन लाईन ज्वेलरी विक्री होत आहे. अगदी तीनशे-चारशे रूपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत आज ज्वेलरींची खरेदी ऑन लाईन जगभरात होत असून भारतात सुद्धा याचे प्रमाण भरपूर वाढत आहे.
Our Sponsors